Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions

Treatment that we offer:

  • Chemical peel
  • Skin Brightening therapy
  • Derma jet facial
  • PRP treatmen

Hair treatment

  • PRP for Hair Loss
  • Leech therapy for Hair loss https://youtu.be/Y-EnS7nj4KA
  • Derma roller Faciality for Hair loss
  • Hair regrowth by mesotherapy

Special ayurvedic Hair Treatment

  • Keshayurved is the India’s first Ayurvedic Hair testing lab and research centre.
  • Leech therapy for Hair loss
  • Microscopic analysis of scalp.
  • Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s
  • Dandruff and Hair Scalp problems

Wide range of hair and skin care herbal products


Skin Clinic:

We treat all type of skin problem and disease with the help of modern and Ayurveda treatment

  • Skin Tag removal
  • Mole removal
  • Warts removal
  • Simple and effective method of weight loss program

About Doctors in Clinic.

Dr. Anjali S. Thul

(Skin and Hair Consultant)

BAMS, PGDEMS (Emergency medical services), PGDCC (Diploma in Cosmetology).

A graduate of the Tilak Ayurved Medical College, Pune (MUHS Nashik University) and a post-graduate diploma in emergency medical services from Ruby hall Clinic, Pune.  She has acquired post graduate Diploma in Cosmetology from Indian Institute of Laser and Aesthetic Medicine, Pune. Specializes in non-surgical Hair Loss Management and non-surgical Facial Cosmetology procedures like Peels, PRP, MDA, Skin Brightening therapy, Leech therapy for Hair loss. Etc.

Her dedication and hard work have made ‘Dr. Thul’s Skin & Hair Clinic’, the first and last stop in the field of cosmetology and Trichology by treating the patient entirely according to the teachings of Ayurveda, a 5000-year-old Indian medicine, with the aim of detoxifying, rejuvenating and vitalizing the human body. Offering everyone services in hair and scalp treatment when almost none existed. The center encompass comprehensive services in the cosmetology and trichology segment.


About Doctors in Clinic.

Dr. Sachin R. Thul

(Panchakarma Tadnya and Spa Consultant).

Chief Consultant at Dr. Thul’s, Skin & Hair Clinic, Wagholi, Pune.

BAMS. Pharmaceutical Sciences (Clinical Research), PGDEMS, PGCACT (Certificate Ayurved cosmetology and trichology).

A Graduate from MHUS Nashik university, Master of Science in Pharmaceutical Medicine (Clinical research) from UDIRT depart in MUHS Nashik and KEM hospital Mumbai, a post-graduate diploma in emergency medical services from Ruby hall Clinic, Pune. He has acquired post graduate certification in Ayurved Cosmetology and trichology, Pune. Along with he has completed the PCM (Panchakarma) course from ‘Dr. Kulkarni’s Arogyadham’, Thane, He has acquired training and Certification in advance Vidhagni karma and pain management under the guidance of Dr. Kulkarni Sir (Arogyadham’, Thane).

He has Specializes in Panchakarma (Vaman, Verechan, Basti, Nasya, Rakta mokshan, Shirodhara) etc. He has Specializes in non-surgical Hair Loss Management and PRP, MDA, Skin Brightening therapy, Leech therapy for hair loss, Viddhagni karma in all type of pain management.

He also has working in Clinical research sector in the department of Pharmacovigilance in the world’s top third multinational CRO (Clinical research organization) ‘Syneos Health Clinical’ for 9 years after Completion of Master degree in Clinical research. He passionate about new drug development and Providing valuable service for Social cause in new drug development.    

केशायुर्वेदाची विश्वव्यापी ध्वजपताका

डॉ. अंजली यांच्या घरात डॉक्टरकीचा कोणताही वारसा नव्हता. तरीही आपण डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. एमबीबीएसला नंबर लागला नाही, त्यामुळे थोडे वाईट वाटले. परंतु वस्तुस्थिती स्वीकारून त्यांनी बीएएमएसला प्रवेश घेतला. सामान्यपणे वैद्यकीय क्षेत्रात नव्याने येणार्याच्या मनात असतात; तसेच विचार डॉ. अंजली यांच्याही मनात होते. त्यांनाही आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची इच्छा नव्हती. अॅलोपॅथीमध्ये लवकर रिझल्ट मिळतो आणि पैसेही चांगले मिळतात. त्यामुळे अॅलोपॅथीचीच प्रॅक्टिस सुरू करायची, असे डॉ. अंजली यांच्या मनात होते.
पण लवकरच अॅलोपॅथीच्या मर्यादा, त्याचे साईड इफेक्टस लक्षात यायला लागले. पेशंटचे रिझल्ट्स, रिव्ह्यूजही विपरित यायला लागले. त्यामुळे अॅलोपॅथीसोबत आपण किती पुढे जाऊ शकतो, याचा चांगला अंदाज त्यांना आला. महाविद्यालयात शिकत असताना आणि नंतर केलेल्या इंटर्नशिपच्या आधारावर क्लिनीक सुरू केले. आयुर्वेदात गुरू असे फार कोणी मिळाले नाहीत. परंतु आयुर्वेदाच्या पुस्तकांचे वाचन करून त्यातूनच पुढेही आयुर्वेदाचे शिक्षण सुरू ठेवले. वाचन आणि त्याच्या आधारावर प्रॅक्टिस हाच आयुर्वेदाचा कणा आहे, असे डॉ. अंजली सांगतात.
सुरवातीला अॅलोपॅथीची प्रॅक्टिस केल्यानंतर आयुर्वेदाकडे वळायला पाहिजे, असे वाटू लागले. त्यानुसार मग आयुर्वेद आणि अॅलोपॅथी अशी मिश्र प्रॅक्टिस सुरू केली. पेशंट खूपच त्रस्त असेल, तर त्याला पहिले अॅलोपॅथीची औषधे द्यायचे. त्याला जरा आराम पडला की, त्याला स्थिर ठेवण्यासाठी आणि त्यानंतर त्याचे दुखणे मुळापासून दूर करण्यासाठी त्याला आयुर्वेदिक उपचार करायचे, असा शिरस्ता अंजली यांनी सुरू ठेवला. त्यातून पेशंटकडून चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. पेशंटला आराम आणि रोगाचे समूळ उच्चाटनाची सुरवात असा दुहेरी फायदा होऊ लागला. पेशंटलाही त्याच्या शरीर आणि मनाच्या पातळीवर आयुर्वेदिक औषधांचे परिणाम जाणवू लागले.
त्वचा आणि केस याचे पेशंट तसे केसनंद परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु त्यांना योग्य रिझल्ट देणारे डॉक्टर मिळत नव्हते. आम्ही आमच्या पद्धतीने उपचार करत होतो. परंतु मनासारखा परिणाम मिळत नव्हता. अशातच ओळखीतल्या एका व्यक्तींकडून केशायुर्वेदबद्दल मोबाईलवर एक संदेश आला. त्या संदेशानुसार डॉ. हरिश पाटणकर सरांचे एक प्राथमिक लेक्चर होते. त्या लेक्चरला गेल्यावर आपल्याला जे हवे, ते या व्यक्तीकडे आहे, असे वाटले. आमच्या परिसरातल्या स्कीन आणि हेअरच्या पेशंटसाठी आयुर्वेद बेस हवाच होता. त्यानंतर पाटणकर सरांच्या मासिक बॅचमध्ये डॉ. सचिन थूल यांनी प्रवेश घेतला. तिथल्या प्रशिक्षणानंतर आयुर्वेदिक प्रॅक्टिसबद्दल त्यांच्या कल्पना, संकल्पना आणि दृष्टीकोन यामध्ये आमुलाग्र बदल घडला. हा बदल सकारात्मक होता. केशायुर्वेद या नव्या संकल्पनेतून आमच्याकडे येणार्या स्कीन आणि हेअरच्या पेशंटसाठी अत्यंत उपयुक्त शिक्षण-प्रशिक्षण मिळाले. कारण आमच्याकडे जे पेशंट येत त्यांच्या साध्या समस्यांचेही निदान आमच्याकडून योग्य रितीने होत नव्हते, असे त्या प्रशिक्षणानंतर जाणवले. प्रशिक्षणानंतर विविध शास्त्रशुद्ध अचूक चाचण्यांच्या सहाय्याने निदान करण्याची व्यवस्था आणि त्यामुळे पेशंटला तातडीने पडणारा फरक या गोष्टी आमच्यासाठी फारच उपयुक्त ठरल्या, डॉ. अंजली केशायुर्वेदाच्या प्रवासाबाबत सांगत होत्या.
डॉ. अंजली प्रॅक्टिस करतात, त्या परिसरात ग्रामीण भाग मोठा असल्यामुळे सुरवातीला त्यांना पेशंटना खूप समजावून सांगावे लागले. परंतु एकदा पेशंटचा विश्वास बसला की ते स्वतः तर उपचार करवून घेतातच; तसेच आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांनाही शिफारस करतात. वैद्य पाटणकर सरांनी सांगितल्यानुसार, या प्रक्रियेत डॉक्टर आणि रुग्ण या दोघांचाही फायदा होतो. डॉक्टरची प्रॅक्टिस वाढल्यामुळे त्याला आर्थिक फायदा होतो, तर रुग्णांना तातडीने रिझल्ट मिळाल्याने त्यांचाही फायदा होतो. केशायुर्वेदच्या अद्ययावत प्रयोगशाळेत आम्ही आमच्याही पेशंटचे सॅम्पल्स पाठवत असतो. दिवसाचे अंदाजे दहा पेशंट आले, तर त्यापैकी पाच हेअरचे आणि पाच स्कीनचे पेशंट असतात. त्यामुळे आम्ही तसे नियमित सॅम्पल्स पाठवत असतो, असे त्यांनी नमूद केले.
ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणवून घ्यायला खूप अभिमान वाटतो. परंतु गेल्या काही महिन्यांत वैयक्तिक समस्या आणि क्लिनीकचे शिफ्टींग यामुळे केशायुर्वेदच्या वाढीसाठी, त्याच्या प्रचार-प्रसारासाठी जितका वेळ द्यायला पाहिजे, तितका देता आला नाही, याची खंत त्यांना वाटते. वास्तविक केशायुर्वेदची फ्रँचायजी घेतलेल्यांनी महिन्याला दहा पेशंट तपासले, तरी फार मोठे काम होऊ शकते, असे त्यांना वाटते. केशायुर्वेद ही मुळात एक चळवळ आहे. त्यातील डॉक्टर, रुग्ण, फ्रँचायजी या गोष्टी व्यवस्थेचा भाग म्हणून आलेल्या आहेत. परंतु मुळात प्रत्येक माणसाला उत्तम आरोग्य जगण्याची सवय लावण्यासाठी, त्यासाठी आयुर्वेदाशी आपले जीवन संलग्न करून घेण्यासाठी चालवलेली ही चळवळ आहे, असे डॉ. अंजली सांगतात. ही चळवळ पुढे नेण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु त्यात जास्त पुढाकार डॉक्टरांना घ्यावा लागेल.
केशायुर्वेद ही मानवी शरीरावरील केस आणि त्वचा या अत्यंत छोट्या घटकावर आधारित निदान व उपचारप्रणाली आहे. आताच्या प्रचंड धावपळ, स्पर्धा आणि धकाधकीच्या काळात माणसाचे स्वतःच्या शरीराकडे जवळपास संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण जगात केवळ मोजकी माणसे आपल्या शरीराकडे लक्ष देतात. शरीर सुदृढ, निरोगी राहण्यासाठी व्यायाम करतात, आयुर्वेदात सांगितलेली जीवनपद्धती अवलंबतात पण त्यांची संख्या जगाच्या तुलनेत अत्यल्पच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केशायुर्वेद म्हणजे आयुर्वेदाचे नॅनो रूप आहे. ज्याच्याद्वारे माणसाला प्रचंड व्याप्ती असलेल्या आयुर्वेदाचा सुक्ष्म रूपात ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन आणि अनुभव घेता येतो. मानवी शरीर, मन आणि आत्म्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या उपचारपद्धतीकडे लोक वेगाने आकर्षित होत आहेत. मानवासाठी लाभलेले हे एक मोठे वरदानच आहे, असे डॉ. अंजली मानतात.
केशायुर्वेदच्या चळवळीच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसार कार्याशी जोडले गेल्याबद्दल डॉ. अंजली स्वतःला धन्य मानतात. तसेच डॉ. पाटणकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमविषयी कृतज्ञताही व्यक्त करतात. केशायुर्वेदाची ही ध्वजपताका त्याच्यातील आंतरिक ऊर्जा, उपयुक्तता आणि अचूकता यामुळे अगदी थोड्याच काळात विश्वव्यापी बनेल, अशी खात्रीही डॉ. अंजली व्यक्त करतात.

Organization Details

नाव : डॉ. अंजली सचिन थूल
शिक्षण : बी.ए.एम.एस. (आयुर्वेद)
क्लिनिकचे नाव : डॉ. थूल्स स्किन अँड हेअर क्लिनीक
पत्ता : सरस्वती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, नेक्सा सर्व्हिस सेंटरजवळ, केसनंद रोड, वाघोली, पुणे.
मोबाईल : 9403205004
ईमेल : [email protected]
कधीपासून प्रॅक्टिसमध्ये - 2016 पासून
केशायुर्वेद संलग्नित - 2017 पासून

Our Specialities

1. One stop solution for all your hair and skin problem. Accurate diagnosis and perfect treatment. Complete Scalp Analysis , Photography , Microscopic Testing as well as HQ (Hair Quotient ) and HP (Hair Prakruti ) analysis. Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s , Cosmetologist’s , Trichologist’s. Wide range of hair and skin care herbal products.